🕉️ अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा 🕉️
आयोजक: आसरा फाउंडेशन प्रायोजक: सावरकर आयएएस स्टडी सर्कल, दादर, मुंबई
सहाय्यक: मान मराठी मनाचा. सह-सहाय्यक : पवित्राय ग्लोबल ट्रेनिंग हब
-------------------------------------------------------------------------------
प्रश्नमंजुषा स्पर्धा
दुसरी फेरी
5/8/2020 at 9.00 pm
अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा । द्वितीय पातळी । भाग १। All India Quiz । Round 2 । Part 1
अखिल भारतीय प्रश्नमंजुषा स्पर्धा । द्वितीय पातळी । भाग 2। All India Quiz । Round 2 । Part 2
नमुना प्रश्नपत्रिका / Sample Q.Paper
आणि And
संवाद २
युट्युब वाहिनीवरून थेट
मराठी संवादासाठी येथे स्पर्श करावा.
Discussion 2
Live from our YouTube channel
Please click here For English discussion
संवाद १
युट्युब वाहिनीवरून थेट
मराठी संवादासाठी येथे स्पर्श करावा.
-----------------------------------------------------------
Quiz competition
ROUND 2
Discussion 1
Live from our YouTube channel
Please click here For English discussion
------------------------------------------------------------
For Question bank for 2nd round, Please click here
For video lectures set in English, Please click here
मराठी व्याख्यान संचासाठी येथे स्पर्श करावा.
-------------------------------------------------------------
Quiz competition : Round 1
वयोगट: सर्व वयोगटांसाठी खुला
माध्यम:
मराठी
/
हिंदी
/
इंग्रजी (For information in English, Please click here)
विषय: सामान्य अभ्यास ( विषय: यंत्रमानव विद्या, संगणक विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, भारतीय राजकारण, अर्थशास्त्र, मौर्य, सातवाहन, वाकटक, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव, होयसळ, विजयनगर आणि मराठा साम्राज्यासारख्या राजवंशांचा विशेष संदर्भ असलेला इतिहास. सशस्त्र क्रांतिकारक लढा आणि सामाजिक सुधारणांच्या विशेष संदर्भात राष्ट्रीय स्वातंत्र्यसंग्राम,भारतातील किल्ले, लेणी, स्मारके, कला, स्थापत्यशास्त्र, संस्कृती यांचा अभ्यास.भूगोल, पर्यावरण विज्ञान, शेती, भारतातील पर्यटन, अवकाश विज्ञान, खेळ, संगीत, चालू घडामोडी.)
प्रथम पुरस्कारः 5000/- रु.
द्वितीय पुरस्कारः 3000/- रु.
दोन उत्तेजनार्थ पुरस्कार: प्रत्येकी 1000/- रु.
नावनोंदणीची दिनांक : 17 जुलै 2020 रात्री 10.00 वाजेपर्यंत
पहिली फेरी: ऑनलाईन चाचणी, दिनांक 19 जुलै 2020 सकाळी 11.00
निकाल: दिनांक 24 जुलै रोजी रात्री 9.00 वा.
दुसर्या फेरीसाठी 100 उत्कृष्ट सहभागी निवडले जातील.
दुसरी फेरी: ऑनलाईन चाचणी दिनांक 2 ऑगस्ट 2020 , सकाळी 11.00
निकालः दिनांक 5 ऑगस्ट 2020 रात्री 9.00
अंतिम प्रश्नमंजुषेसाठी 20 उत्कृष्ट सहभागी निवडले जातील.
तिसरी फेरी: थेट प्रश्नमंजुषा, दिनांक 15 ऑगस्ट 2020.
श्री. नंदकुमार मोघे, माजी प्रशासकीय अधिकारी, माजी वन्यजीवन सल्लागार - महाराष्ट्र शासन.
श्री. सुहास नार्वेकर, माजी सभासद - महाराष्ट्र राज्य संगणक सल्लागार समिती
श्री. महेश कुलकर्णी, संचालक - सावरकर IAS स्टडी सर्कल.
सौ. पवित्रा सावंत, समुपदेशक, संचालक - पवित्राय ग्लोबल ट्रेनिंग हब.
श्री. बाळकृष्ण लोहोटे, संघटक सचिव - मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियन.
श्री. मंदार नार्वेकर, सरचिटणीस - मी मराठी एकीकरण समिती.
संपर्क: 8108 40 06 05 / 9820 36 42 43
माहिती, नियम व अटी
1. एक व्यक्ती एकदाच भाग घेऊ शकते.
2. आवेदन
पत्र
(प्रवेश
अर्ज) दिनांक
17
जुलै,
2020
रात्री
10.00 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जमा
करावा.
आवेदनपत्र दुवा (अर्जाची
लिंक)
येथे उपलब्ध असेल: आवेदनपत्र
3. प्रवेश शुल्क: विनामूल्य
4. संपूर्ण स्पर्धा केवळ ऑनलाइन स्वरुपात घेण्यात येईल. म्हणून स्पर्धकाकडे त्यासाठी उपकरणे (इंटरनेट असलेला स्मार्टफोन/लॅपटॉप/डेस्कटॉप/टॅब) उपलब्ध असणे आवश्यक आहे.
5. पहिल्या फेरीसाठी 100 (बहुपर्यायी प्रश्न) एका तासाच्या आत सोडवावे. बरोबर उत्तराला +1 गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी दंड म्हणून तुमच्या गुणसंख्येतून 1 गुण वजा केला जाईल. उत्तर न दिलेल्या प्रश्नांसाठी शून्य गुण दिले जातील. अधिक स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर एखाद्या स्पर्धकाने 70 प्रश्नांचे योग्य उत्तर दिले, 10 प्रश्नांची चुकीची उत्तरे दिली आणि 20 प्रश्नांचे कोणतेही उत्तर दिले नसेल, तर त्याची गुणसंख्या +70 - 10 + 0 = 60 असेल.
6. दुसरी फेरीदेखील पहिल्या फेरीप्रमाणेच असेल. तथापि प्रश्नांची काठीण्यपातळी जास्त असेल.
7. तिसरी फेरी ‘गूगल मीट’वर घेतली जाईल. त्यासाठी स्पर्धकाकडे उपकरणे (चांगल्या इंटरनेटसह स्मार्टफोन/लॅपटॉप/डेस्कटॉप/टॅब, इअरफोन, माईक इ.) असणे आवश्यक आहे.
8. पहिल्या आणि दुसर्या फेरीतील किमान 50% प्रश्न “सावरकर आयएएस स्टडी सर्कल (Savarkar IAS Study Circle)” आणि “यूपीएससी-गुरू (UPSC-Guru)” या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध असलेल्या निःशुल्क व्हिडिओ लेक्चरवर आधारित असतील. आपण खालील दुवा( लिंक) वरूनदेखील जाऊ शकता.
https://savarkariasstudycircle.blogspot.com/2020/06/power-file-for-study-of-exams.html
9. अंतिम फेरीत दोन किंवा अधिक स्पर्धकांमध्ये समान गुण मिळवण्याच्या परिस्थितीत, तीन वेळा अतिरिक्त प्रश्न विचारल्यानंतरही गुण समान राहिल्यास, क्रमांक व पारितोषिक मूल्य उमेदवारांमध्ये तितकीच विभागले जाईल.
10. अंतिम फेरीच्या सुरुवातीपूर्वी अंतिम फेरीचे नियम घोषित केले जातील.
11. कोणताही वाद झाल्यास, स्पर्धा समितीच्या निर्णयाचे मूल्यांकन किंवा स्पष्टीकरण अंतिम मानले जाईल.
12. पुरेशी नावनोंदणी (किमान 150 स्पर्धक) झाली नसल्यास, स्पर्धा समिती स्पर्धा रद्द /स्थगित करू शकते.